महत्वाची बातमी! एसटी महामंडळात 17,742 पदांची भरती, परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती…

पुणे : एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत 17,742 ड्रायव्हर, कंडक्टर आणि इतर कर्मचारी भरती केले जातील. ही भरती महामंडळाच्या ताफ्यात नव्याने येणाऱ्या 8,300 बसेससाठी तात्पुरती पद्धतीने करण्यात येणार आहे.

नियमित कर्मचाऱ्यासाठी अर्थ खात्याकडे अर्ज पाठविण्यात आले आहे. अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मात्र, तोपर्यंत या बसेस चालाव्या म्हणून ही कंत्राटी पद्धतीने भरती करावी लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सामान्य प्रवाशांना उत्तम सेवा देणे हेच एसटीचे तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यामुळे काम करताना चालक-वाहकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी, आगारस्तरावरील निर्णयप्रक्रिया तसेच शिस्तभंग कारवाईच्या बाबतीत न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी कर्मचारी संघटनेच्या बैठकीतून दिले आहेत.

एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री सरनाईक यांची काल सकारात्मक चर्चा झाली. यावेळी, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी विधान भवनात सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. त्यानंतर, आज विधानसभेत बोलताना त्यांनी नव्याने कंत्राटी भरती केली जाणार असल्याचे सांगितले.
लवकरच मुंबईत 30 स्लिपींग कोच बसेस असतील तर 170 बैठ्या खुर्च्यांच्या वोल्वो बसेसही दाखल होती, या दोन्ही प्रकारच्या बसेस मुंबईसाठी मागविण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात आम्ही लवकरच 8300 बसेस समाविष्ट करणार आहोत.
त्यासाठी, एसटी महामंडळात 17,742 ड्रायव्हर, कंडक्टर आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने येणाऱ्या 8300 बसेससाठी ही कंत्राटी भरती केली जाईल, असे सरनाईक यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.
कर्मचारी अडचणी व उपाय…
सरनाईक यांनी स्पष्ट केले की, कर्मचारी रोजच्या कामात अनेक अडचणींचा सामना करतात. यात ट्रॅफिक, बसांची तांत्रिक अडचण, प्रवाशांच्या तक्रारी, आणि प्रशासनिक निर्णय यांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्तीवर भर दिल्यामुळे, या अडचणींवर अधिक परिणामकारक मार्गाने तोडगा काढला जाईल.
5012 सहायक्क प्राध्यापक पदांची भरती…
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील एकूण रिक्त 11,918 पदांपैकी 5012 पदांची भरती करण्यासही मान्यता देण्यात आली आहे, अशी माहीती मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.
प्रवाशांसाठी फायदे…
महामंडळाचे तसेच कर्मचार्यांचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे सामान्य प्रवाशांना उत्तम सेवा पुरवणे. नव्या भरतीमुळे फक्त बसेस चालू राहणार नाहीत, तर वेळेवर सेवा, प्रवाशांच्या तक्रारींचे त्वरीत निवारण आणि बससेवेची गुणवत्ता वाढेल.