युद्धामुळं उडाला महागाईचा भडका! LPG नंतर आता तेलाच्या किंमती कडाडल्या, एका लीटरची किंमत किती?


पुणे : देशात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. भारतातल्या नागरिकांना. युद्धाचा परिणाम फक्त जीवितहानी, विध्वंसापुरताच मर्यादित नाहीये, तर या तिन्ही देशांमुळे भारतासह इतर अनेक देश होरपळत आहेत.

भारत गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस टंचाई जाणवत असून त्यामुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत आणखी वाढझाली आहे. अशातच आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयात विस्कळीत झाल्याने गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे.

सध्या खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति किलो १३ ते १५ रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. त्यासोबतच सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर कडाडले असून ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा हा मोठा फटका बसला आहे.

किती रूपयांनी महागलं तेल?

पाम तेल १२० होते १३५ झाले.

सूर्यफूल १४० चे १५५ रुपये लिटर झाले.

शेंगदाणा तेल १८० चे १९० आहे. फ्राई नूडल्स सेव यांचे दरही किलो च्या मागे ५ रुपयांनी वाढले.

डालडाचे ही भाव आहेत १० रुपयांनी वाढले आहे.

बाजारपेठांमध्ये सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.

सूर्यफूल तेल: २८ फेब्रुवारीपर्यंत १६० रुपयांना मिळणारे एक किलो सूर्यफूल तेल आता १७३ रुपयांच्या पार गेले आहे.

सोयाबीन तेल: सूर्यफूल तेलाच्या तुटवड्यामुळे सोयाबीन तेलाची मागणी अचानक वाढली असून त्याचेही दर कडाडले आहेत.

मार्केट यार्डात १५ किलोच्या डब्यामागे ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. बाहेरील राज्यांतून होणारी आवक घटल्याने घाऊक बाजारात १० ते १२ टक्के दरवाढ दिसून येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!