आता बायपास शस्त्रक्रियेसाठी एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांची सभागृहात मोठी घोषणा..

मुंबई : सध्या राज्यात आरोग्याच्या मोठ्या सोयी निर्माण होणे गरजेचे आहे. सध्या दवाखाने मोठे खर्चिक बनले आहेत. यामुळे हा खर्च परवडत नाही. यामुळे सर्वसामान्य लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असे असताना राज्यातील रुग्णालयांमध्ये अनेकांना महात्मा फुले आरोग्य योजनेचा व्यवस्थितपणे लाभ मिळत नसल्याचा मुद्दा भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सभागृहात उपस्थित केला.

यावेळी लोणीकर यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना जाब विचारला. आमच्या मतदारसंघातील एका व्यक्तीला बायपासच्या शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले योजना आणि आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळत नाही. योजनेच्या निकषापेक्षा त्या व्यक्तीला कमी पैसे मिळत असल्याची तक्रार लोणीकर यांनी केली. यांना उत्तर देतांना त्यांनी याबाबत माहीती दिली.
यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मला महात्मा फुले आरोग्य योजनेच्या निकषांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांचे नाव सांगावे. मी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करतो, असे आश्वासन दिले. ते म्हणाले, विठ्ठल कदम नावाचे शेतकरी आहेत. त्यांची बायपास शस्त्रक्रिया करायची आहे. या शस्त्रक्रियेसाठी एका व्यक्तीला 11 लाख रुपये लागतात. सहा लाख रुपये केंद्र आणि राज्य सरकारकडून बायपासच्या शस्त्रक्रियेसाठी दिले जातात.

पण त्यांना फक्त 1 लाख रुपये मिळत आहेत. बायपासला एक लाख रुपयात होत नाही, दोन महिन्यांपासून ऑपरेशन थांबले आहे. त्याच्यामुळे केंद्राचे 3 लाख आणि राज्याचे 3 लाख असतानाही फक्त विठ्ठल कदम यांना एक लाख रुपये मंजूर करु, असे सांगितले आहे. यामुळे अशा प्रकारे अनेक अडचणी येत आहेत.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले, लोणीकर साहेबांनी जो प्रश्न विचारला, आमच्या योजनांमध्ये एक लाख रुपयांची गरज नाही. आमच्या योजनेत बायपास आणि अन्य शस्त्रक्रियांचे निकष स्पष्ट आहेत. आम्ही आयुषमान भारत जेव्हा आमच्याबरोबर जोडली तेव्हा आमच्या चार्जेसमध्ये वाढ झाली. त्यामुळे कुठल्याही रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी एक रुपयाही देण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.