तब्बल पाच दिवस राहणार बँका बंद, उद्या-परवाच बँकिंग व्यवहार करा, जाणून घ्या…

पुणे : मार्च महिन्यात बँकाना खूप सुट्ट्या असणार आहेत. अशातच आता तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर उद्या परवाच करुन घ्या… नाहीतर पुढे पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. पण ऑनलाईन बँकींग आणि UPI डिडिटल सेवा सुरु राहणार आहेत.

17 मार्च ते 22 मार्च 2026 दरम्यान बँका बंद राहणार आहेत. या काळात शब-ए-कद्र, ईद-उल-फित्र, गुढी पाडवा आणि रविवार यासारख्या सुट्ट्या आहेत. ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सेवा नेहमीप्रमाणे उपलब्ध राहतील.
17 मार्च रोजी शब-ए-कद्रसाठी सुट्टी – मंगळवार, 17 मार्च रोजी शब-ए-कद्र निमित्त जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील. ही सुट्टी प्रादेशिक पातळीवर लागू केली जाईल, त्यामुळे राज्यातील उर्वरित भागात बँका नेहमीप्रमाणे खुल्या राहतील.

19 मार्च गुढी पाडवा आणि उगादी – 19 मार्च म्हणजे गुरुवारी गुढीपाडवा, उगादी, तेलुगू नवीन वर्ष आणि नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे अनेक शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. नागपूर, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, इम्फाळ, विजयवाडा, श्रीनगर, जम्मू आणि पणजीसह अनेक ठिकाणी बँकिंग सेवा बंद राहतील.
20 आणि 21 मार्च रोजी ईद-उल-फित्रची सुट्टी – ईद-उल-फितर असल्यामुळे कोची, तिरुवनंतपुरम आणि विजयवाडा येथे बँका बंद राहतील. ईदमुळे 21 मार्च, शनिवारी अनेक राज्ये आणि शहरांमध्ये बँकिंग सेवांवरही परिणाम होईल. दिल्ली, मुंबई, कोलकाता, लखनऊ, जयपूर, भोपाळ, पटना आणि चंदीगडसह अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. तर 22 मार्च रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील.