शिंदवणेत हॉटेल चालकाला बेदम मारहाण; स्थानिक तिघांवर उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

उरुळी कांचन : हॉटेलवर पोरांना जेवायला घालत नाही तू, पोरांकडून जेवण्याचे पैसे घेतो, असे म्हणत शिंदवणे येथील हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना (ता.१२) रोजी दुपारी ४.०० वजनाच्या दरम्यान शिंदवणे हददीत घडली आहे.

या प्रकरणी मारहाण झालेल्या योगेश बाजीराव मांढरे (वय-४० वर्ष,रा. शिंदवणे , ता.हवेली ) यांनी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार श्रवण संतोष शिंदे, श्रेयस संदीप शिंदे, संग्राम शंकर शिंदे (सर्व रा.शिंदवणे ता हवेली जि पुणे) यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्यामाहिती नुसार, योगेश मांढरे यांचे शिंदवणे येथे हॉटेल असून त्याठिकाणी तिन्ही त्यांच्या गावातील आरोपी श्रवण संतोष शिंदे, श्रेयस संदीप शिंदे व संग्राम शंकर शिंदे आले.

त्यानंतर फिर्यादी यांना तू हॉटेलवर पोरांना जेवायला घालत नाही तू पोराकडून जेवण्याचे पैसे घेतो, ही आमची हद्द आहे तूला आमचे हद्दीत हॉटेल धंदा करायचा आहे तर पोरांना जेवायला चारता येत नाही का असे, म्हणत बेदम मारहाण केली आहे.
तिघांनी फिर्यादी यांना लाकडी दाडक्याने व लोखंडी रोडने त्यांच्या कानावर, डोक्याचे पाठीमागील बाजूस, कंबरेवरती,पोटावर, तोंडावर मारहाणार केल्याचं तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकणी पोलिस हवालदार खोमणे हे पुढील तपास करीत आहे.