तू आणि तुझ्या मैत्रिणीसोबत एकत्र संबंध…!!! राजकीय नेत्याकडून कॉलेज तरुणीचं लैंगिक शोषण, राज्यात खळबळ


वर्धा : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका राजकीय नेत्याने २१ वर्षीय तरुणीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथं एका राजकीय नेत्याने २१ वर्षीय तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. नोकरीचं आमिष दाखवून आणि शिक्षणात मदत करण्याच्या बहाण्याने संबंधित राजकीय नेता सातत्याने अश्लील मेसेज करत होता, अभद्र बोलत होता, असा आरोप तरुणीने केला आहे.

मागील पाच वर्षांपासून सातत्याने हा प्रकार सुरू होता, असंही तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. ज्यावेळी हा प्रकार सुरू झाला, तेव्हा पीडित तरुणी १७ वर्षांची होती, त्यामुळे पुलगाव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाकर गमे असं गुन्हा दाखल झालेल्या ७८ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित असल्याची माहिती आहे. आरोपी दिवाकर गमे हा मागील पाच वर्षांपासून पीडितेकडं लैंगिक सुखाची मागणी करत होता.

यासाठी तो पीडितेला गोड बोलून NEET परीक्षेचे क्लासेस लावण्याच्या बहाण्याने नाशिकला घेऊन गेला होता. याठिकाणी एकत्र राहून त्याने पीडितेकडं शरीरसंबंधाची मागणी केली होती. पण पीडितेनं विरोध केला, असंही तिने तक्रारीत म्हटलं आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी दिवाकर गमे हा गेल्या पाच वर्षांपासून तिच्याशी अशोभनीय वर्तन करत होता. पीडितेने आरोप केला आहे की, आरोपीने तिला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले आणि त्या बदल्यात तिच्याशी असभ्य वर्तन करण्यास सुरुवात केली.

केवळ इतकेच नाही, तर आरोपी तिला अश्लील फोटो, व्हिडिओ आणि अभद्र मेसेज पाठवून सातत्याने मानसिक त्रास देत होता. तसेच पॉर्न वेबसाईटवरील लिंक्स पाठवून, त्याप्रमाणे आपण शरीरसंबंध ठेवू, असंही आरोपी पीडितेला सांगायचा, असा आरोप पीडितेनं केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!