अजित पवारांच्या अपघातावरून वातावरण तापलं!VSR च्या मालकाची चौकशी करू नका ; कोणी केली मागणी?

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये सीआयडीकडून व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची कसून चौकशी केली जात आहे. मात्र त्यांच्या या चौकशीवरून आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने मोठी मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीत VSR कंपनीचा मालक अपघाताबाबत लपवाछपवी करत आहे. ते पायलटवर अपघाताची जबाबदारी ढकलून मोकळे होतील. त्यामुळे त्याची चौकशी करू नका अशी मागणी प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे. सीआयडीही त्याला साथ देत आहे असा आम्हाला वाटतं,आधी पुण्यातील सीआयडी हेडकॉटर तर्फे त्याची चौकशी झाली. आता मुंबईमध्ये चौकशी होत असल्याचा आम्हाला समजत आहे. या प्रकरणाकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून ही लपवाछपवी केली जाते का?असा आमचा प्रश्न आहे असं त्यांनी म्हटल आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही के सिंग याची चौकशी पहिल्या दिवशी एकूण 8 तास केल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं.यानंतर पुढील तीन दिवस व्ही के सिंगची चौकशी झाली. या चौकशीदरम्यानच व्ही. के. सिंगने नोंदवलेल्या जबाबासंदर्भात नवा खुलासा समोर आला आहे. आणि यामध्ये त्यांनी थेट पायलटच नाव घेतलं.

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील VSR कंपनीवर पत्रकार परिषदेतून अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या होत्या. यावरून अजित पवारांच्या अपघाताच गुड उकलण्यास आणखीन मदत होणार आहे. या चौकशीतून आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.