इस्त्रायल- इराणच्या युद्धाचा भारतीयांना फटका ; पुण्यातील 80 विद्यार्थी अन् 4 शिक्षक दुबईत अडकले…


पुणे: अमेरिका आणि इस्रायलचे इराणसोबत युद्ध सुरू झाल्यामुळे भारतीयांना याचा मोठा फटका बसला आहे. पुण्यातील नामांकित,कॉलेजच्या 80 विद्यार्थ्यांसह 4 शिक्षक दुबईत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना भारतात सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्राईलच इराणसोबत युद्ध सुरू झाल्याने भारताची मोठी कोंडी झाली आहे. तिन्ही देशाशी भारताचे असलेले संबंध पाहता परिस्थिती आव्हानात्मक आहे. या सर्व परिस्थितीत आता पुण्यातील नामांकित इंदिरा कॉलेजचे 84 जण दुबई मध्ये अडकले आहेत. त्यामध्ये 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांचा समावेश आहे. हे सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. दुबईत अडकलेले हे सर्व विद्यार्थी सुखरूप असून आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सतत संपर्कात आहोत. अशी माहिती कॉलेजच्या डीन कडून देण्यात आली आहे.

दुबईत अडकलेल्या या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी दुबईतील भारतीय दूतावास आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी आमचे बोलणे सुरू आहे, अशी माहिती इंदिरा कॉलेजचे डीन जनार्दन पवार यांनी दिली आहे.तसेच
कृपया कोणी ही घाबरून जाऊ नये, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशात आणले जाणार, महाविद्यालयाकडून आवाहन करण्यात आल आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सुद्धा विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या इराण-इस्त्राइल अमेरिका युद्धामुळे पुण्यातून दुबईला जाणारी चार विमाने रद्द करण्यात आली आहेत. पुण्यातून स्पाइस जेट कंपनीचे मुंबई ते दुबई तसेच एअर इंडिया एक्सप्रेसचे पुणे ते दुबई विमान रद्द करण्यात आले आहे. विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!