बारामती विमान अपघातानंतर पिंकी माळीच्या आईची प्रकृती खालावली ; “मुलगी गेली, आता पत्नीला वाचवा” वडिलांची आर्त हाक…

बारामती : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिचा देखील मृत्यू झाला. पिंकी माळीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून आता त्यांच्या आईची तब्येत खालवली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर आईला मुलीच्या जाण्याने मोठा धक्का बसला. त्यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली असून त्यांना उपचारासाठी दादर येथील सुश्रुषा सिटीजनस को-ऑपरेटिव हॉस्पिटल लिमीटेड मध्ये त्यांना दाखल करण्यात आल आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पिंकी माळी यांच्या आई माया माळी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचे वडील टॅक्सीचालक म्हणून काम करतात. मात्र उपचारांचा खर्च लाखाच्या घरात गेल्याने त्यांच्यावर मोठा आर्थिक संकट आलं आहे.
बारामतीतील विमान अपघातात आपल्या लाडक्या मुलीला गमावल्यानंतर हंबरडा फोडत वडिलांनी, “मुलगी गेली, आता पत्नीला वाचवा” अशी आर्त हाक दिली आहे. यामुळे सध्या संपूर्ण माळी कुटुंबावर मोठ आर्थिक संकट आलं आहे.पिंकी माळीच्या वडिलांना पैसे कुठून उभे करायचे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे त्यांनी आता मित्रपरिवाराकडे आणि विविध समाजसंस्थांकडे मदतीसाठी हात पसरले आहेत.

दरम्यान रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी आणि पत्नीवर योग्य उपचार होण्यासाठी पिंकी माळी यांच्या वडिलांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. मुलीच्या जाण्याने अख्ख कुटुंब हादरून गेल आहे.