मोठी बातमी! पुन्हा राजकीय भूकंप, भाजपला सर्वात मोठा धक्का, राजकारणाला वेगळं वळण…

BJP | महापालिका निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला आहे. असे असताना स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेसाठी मित्रपक्षांच्या मदतीची गरज आहे. यामुळे भिवंडी महापालिकेत घडणाऱ्या राजकीय हालचालींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सध्या याचीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक महापालिकांमध्ये महापौर पदासाठी अद्याप निवडणूक बाकी आहे. चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे भाजपचा महापौर निवडून आला आणि काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला होता. भिवंडी मात्र २० तारखेला महापौर निवडणूक होणार आहे.
याठिकाणी कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. यामुळे फोडाफोडी होणार असून अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. भिवंडीत काँग्रेसकडे ३० नगरसेवक आहेत, तर भाजपकडे २२ जागा आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे प्रत्येकी १२ नगरसेवक आहेत. असे असताना नारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या ९ नगरसेवकांचा गट काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे.

त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे येणाऱ्या काळात याठिकाणी अनेक घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा घेण्याची भूमिका काँग्रेसने स्वीकारलेली नाही.
असे असताना मात्र भाजपमधून येणाऱ्यांशी चर्चा करण्यास काँग्रेस तयार आहेत. नारायण चौधरी पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि नंतर भाजपमध्ये गेले होते. ९ नगरसेवकांसह पाठिंबा देत आहेत, असे त्यांनी सांगितले. यामुळे याठिकाणी अनेक घडामोडी घडणार आहेत.