ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा!उद्धव ठाकरेंकडून ३ स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब, मनसेला वगळलं…


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.उद्धव ठाकरे यांनी मनसेला वगळून आपल्या पक्षातील स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब केल आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक या तीन नावांवर शिक्कामोर्तब केल्याचे समोर आले आहे.तिन्ही चेहरे शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असून तरूण युवा नेते आणि अनुभवी नेते अशी सांगड घालण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

दरम्यान नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले होते. मात्र राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे का? अशी चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेत झाली. याच पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवकांचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी लगोलग घेतल्याचे समोर येत आहे.

दरम्यान ठाकरेंनी घेतलेले या स्वीकृत नगरसेवकांच्या निर्णयामुळे मनसेच्या अपेक्षा वर पाणी सोडल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 28 फेब्रुवारी रोजी या स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान मनसे आणि ठाकरे गटात मिठाचा खड्डा पडला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!