राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या, केलं मोठं वक्तव्य, म्हणाल्या अमोल कोल्हे यांना….


पुणे : दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाविषयी शरद पवार पक्षाने भूमिका जाहीर केली. अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात बैठकांचे किती सत्र झाले. कुठे बैठकी झाल्या इथपासून ते सीसीटीव्हीत कोण-कोणते नेते दिसले इथपर्यंतच्या अनेक बातम्या समोर आल्या.

तसेच काल या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी असे वक्तव्य करत या चर्चांना पूर्ण विराम मिळाल्याचे संकेत दिले होते. तर आज शिवनेरी येथे आल्यानंतर त्यांनी विलिनीकरणासह दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र काम करण्याविषयी मनातील भावना व्यक्त केल्या.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारले. तसेच महानगरपालिकेसह, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र लढणार होते. अमोल कोल्हे यांना महत्त्वाचे पद देण्यात येणार होते. तटकरे आणि पटेलांमुळे हे सर्व रखडतंय का याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी सुळे यांनी रामकृष्ण हरी असे उत्तर दिले. तर अमोल दादा यावर सविस्तर बोलले आहेत.

पक्षाचं वास्तव अमोल दादा यांनी मांडले आहे. वेगळं मला बोलावासं वाटत नाही, असे सुळे म्हणाल्या. माझा भाऊ गेला आहे. त्याचं दु:ख आयुष्यभर भरून निघणार नाही. आता दादा राहिले नाहीत, काय फरक पडतो आता काय खोटं काय खरं. सीसीटीव्ही कशाला हवा. माणूस आहेत ना बोलायला. खरं, आता सगळ्यांना माहिती आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तर त्याचवेळी सुप्रिया सुळे यांनी मनातील भावनाही व्यक्त केल्या. आम्हाला ही एकत्र काम करायची इच्छा आहे. काल ही होती, आज ही आहे आणि उद्या राहील पण या गोष्टीला आता थोडा वेळ पूर्णविराम देऊयात, असे त्या म्हणाल्या. आम्हाला अस्वस्थ वाटतं, आपल्यापेक्षा मोठे असलेल्या लोकांच्या विरोधात बोलणं मला आवडत नाही. वास्तव माझ्या दादाला माहिती होतं आणि मला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!