‘पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी विचारांशी बेईमानी….; राज-एकनाथ शिदें भेटीवर संजय राऊतांचा जोरदार टोला


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलं आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असून विचारांशी बेईमानी केली असल्याच त्यांनी म्हटले आहे

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, कोणी कोणाला भेटणं यावर बंधन नाही. पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरोधात आमचं टोकाचं भांडण आहे. हे टोकाचं भांडण एकनाथ शिंदे यांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, विचारांशी बेईमानी केली म्हणून आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती असताना प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरेंशी युती केल्यानंतरही राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीवर माध्यमांना त्यांनी असं म्हटलं आहे की,तुम्ही राज ठाकरेंना हा प्रश्न विचारत का नाही? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तेच देतील. आमही हेरगिरी करत नाही. मीडियाच्या माध्यमातूनच आम्हाला या भेटीबद्दल समजतं असं त्यांनी स्पष्ट म्हटलं.

दरम्यान बाळासाहेबांशी बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीची आमचं भांडण आहे आणि कायम राहील. एक दिवस या भांडणात आमचा विजय होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!