पुण्यात खळबळ! तुझी अवस्था बाबा सिद्दिकींसारखी करू…,गोल्डन मॅन सनी वाघचौरेला बिश्नोई गँगकडून धमकी, ‘इतक्या’ कोटींची मागणी


पुणे : गोल्डन मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले सनी नाना वाघचौरे यांना बिश्नोई गँगकडून ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळखले जाणारे सनी नाना वाघचौरे यांना खंडणीसाठी धमकीचा फोन आल्याने पुणे आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

अज्ञात व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करत थेट ५कोटी दे, नाहीतर तुझा बाबा सिद्दिकी करू, अशी गंभीर धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २५ जानेवारी रोजी कॅनडाच्या क्रमांकावरून पहिला फोन आला.

त्यानंतर २६ जानेवारीला व्हॉट्सॲपवर सविस्तर धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. या मेसेजमध्ये पाच दिवसांत पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती निर्माण करणारी भाषा वापरण्यात आली होती. यामुळे सनी वाघचौरे आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

धमकीच्या मेसेजमध्ये, तू कुठेही पळून जा, कोणतीच ताकद तुला वाचवू शकत नाही. पाच दिवसांत पैसे दे, नाहीतर तुझी अवस्था बाबा सिद्दिकीसारखी करू, असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच सोनं घालण्यावरून थेट हल्ल्याची भाषा वापरण्यात आल्याने या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.

या धमकीनंतर सनी वाघचौरे यांनी तात्काळ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे. गुन्हे शाखा आणि गुंडाविरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून कॉल आणि मेसेज पाठवणाऱ्या नंबरचा तपास घेतला जात आहे. पोलिसांकडून आवश्यक सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.

लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने यापूर्वीही विविध कलाकार, उद्योजक आणि प्रसिद्ध व्यक्तींना धमकीचे फोन आणि मेसेज आले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातही पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!