बदल्यांचा धडाका! IAS अधिकारी मनिषा म्हैसकर- पाटणकर यांच्यावर मोठी जबाबदारी, मिलिंद म्हैसकर यांचीही बदली


मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेत मोठे फेरबदल करण्यात आले असून राज्यातील दोन बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय जारी करण्यात आले आहेत.ज्येष्ठ सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर पाटणकर आणि मिलिंद म्हैसकर यांची बदली करण्यात आली आहे.

राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी मनिषा म्हैसकर पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे गृह विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गृह विभाग हा थेट मुख्यमंत्र्यांच्या आखत्यारित्या येतो.या विभागात अतिरिक्त मुख्य सचिव हे पद पोलीस दलाचे प्रशासन, बदल्या आणि महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयासाठी कणा मानले जाते.

मनीषा पाटणकर म्हैसकर या 1992 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी विविध महत्त्वाच्या विभागामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या जागी आता मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदाची जबाबदारी होती. आता 31 जानेवारीला मिलिंद म्हैसूरकर यांच्याकडे त्यांचा कार्यभार सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!