आनंदाची बातमी! सोन्या, चांदीचे दर कोसळले, जाणून घ्या आजचे नवे दर…

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

तसेच त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सोनं आणि चांदीच्या दरांनी उच्चांक गाठल्यानंतर शुक्रवारी सकाळी मोठी घसरण नोंदवली गेली.
त्यामुळे वाढत्या किमतींमुळे चिंतेत असलेल्या सामान्य ग्राहकांसाठी आजचा दिवस काहीसा दिलासा देणारा ठरला आहे. 29 जानेवारी रोजी विक्रमी पातळीवर पोहोचलेले सोनं-चांदीचे दर 30 जानेवारी रोजी थेट खाली आले.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली असून, बाजारात नफा वसुलीचा प्रभाव स्पष्ट जाणवत आहे. MCX वर सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचा भाव तब्बल 5.55 टक्क्यांनी घसरून 1,60,001 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. काही दिवसांपूर्वीच सोन्याने 1,93,096 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता, मात्र आज एका झटक्यात जवळपास 9,400 रुपयांची घसरण झाली आहे.
चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, ती 4.18 टक्क्यांनी घसरून 3,83,177 रुपये प्रति किलोवर आली आहे. कालच 4,20,048 रुपये प्रति किलोचा विक्रम करणारी चांदी आज एका दिवसात तब्बल 16,700 रुपयांनी खाली आली आहे.
फक्त फ्युचर्स मार्केटच नाही तर किरकोळ बाजारातही आज मंदीचं वातावरण पाहायला मिळालं. बुलियन मार्केटमधील माहितीनुसार, आज सोन्याचा किरकोळ भाव 5,300 रुपयांनी घसरून 1,65,180 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव 23,360 रुपयांनी घसरून 3,79,130 रुपये प्रति किलो झाला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातही दबाव कायम असून, जागतिक पातळीवर स्पॉट गोल्ड 1.65 टक्क्यांनी घसरून 5,217 डॉलर प्रति औंस झाला आहे. याचप्रमाणे स्पॉट चांदीचे दरही 2.86 टक्क्यांनी घसरून 110 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांतही बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
