मोठी बातमी! अजित पवारांच्या विमानाचा पायलट ऐनवेळी बदलला? घातपाताचा संशय? धक्कादायक माहिती समोर…


पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगते नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात दुर्देवी अंत झाला. या विमान अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे .अजित पवार यांचे विमान दुसराच पायलट चालवणार होता. कंपनीने बारामती उड्डाणासाठी दुसऱ्या एका वैमानिकाची निवड केली होती. ऐनवेळी विमान पायलट बदलण्यात आल्याने या अपघाताच्या तपासाला आता आणखीन वेग आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या विमानाचे मयत कॅप्टन सुमित कपूर यांच्या मित्राने अजित पवार ज्या विमानात बसणार होते ते विमान दुसराच पायलट चालवणार होता. कंपनीने बारामती उड्डाणासाठी दुसऱ्या वैमानिकाची निवड केली होती. मात्रत्याला मुंबईतील वाहतूक कोंडीत अडकल्याने उशीर झाला. कंपनीने कॅप्टन कपूर यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. त्यांच्यासह को-पायलट शांभवी पाठक यांनी या विमानातून उड्डाणही केलं.

कॅप्टन सुमित कपूर यांना देखील सुमारे 15000 हून अधिक तास विमान उडवण्याचा अनुभव होता.ते साधेसुधे वैमानिक नव्हते, ते अत्यंत अनुभवी होते, त्यांच्याकडून काही चूक होण्याची शक्यता कमी होती. काही दिवसांपूर्वीच सुमित हे हाँगकाँग येथून परत आले होते. हे विमान बारामतीला नेण्याआधी अवघे काही तास आधी त्यांना विमान उड्डाणाची माहिती मिळाली होती, अशी माहिती सुमित यांच्या मित्रांनी दिली.

या विमान अपघात प्रकरणानंतर राज्य सरकारने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाच्या तपासाला चौकशी सुरूवात केली आहे. प्राथमिक चौकशी होईल, या अपघाताचा तपशील नीट तपासला जाणार आहे. अपघात नेमका का, कसा झाला, त्याची नेमकी कारणं काय या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!