अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या पत्राला उड्डाणमंत्र्यांनी दिल उत्तर,म्हणाले….

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी 28 जानेवारी हा दिवस काळा दिवस ठरला.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.आता या विमान अपघाताबाबत वेगवेगळी माहिती समोर येत असतानाच या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राला आता उत्तर देण्यात आलं आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनीं पत्र पाठवलं होतं. या पत्राचं त्यांनी उत्तर दिलं आहे. या विमान अपघाचा तपास ब्युरो यांनी तपास सुरु केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार, तपास सुरू केला आहे, तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल, असं त्यात म्हटलं आहे.
तसेच या पत्रात अपघाताची कसून चौकशी केली जाईल. सर्व टेक्निकल रेकॉर्डस, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नये, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून, चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील’ असं आश्वासन उड्डाण मंत्र्यांनी दिल आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. आज अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार कुटुंबीयांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे.
