पुण्यात अपघाताचा थरार! मद्यधुंद बस चालकाची 4-5 वाहनांना जोरदार धडक, फरपटत नेल…

पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात मद्यधुंद स्कूल बस चालकाने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चालकाने अनेक वाहने फरपटत नेली.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या अपघात प्रकरणी बस चालकाला अटक करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली परिसरात एक स्कूल बस 30 ते 40 मुलांना घेऊन घरी सोडण्यासाठी निघाली असताना बसमधील मद्य धुंद बसचालकाने चार दुचाकी आणि एका कारला धडक दिली. त्यानंतर या बसचालकाने वाहने फरफटत नेली.
या धडकेत कोणीही जखमी झाले नसले तरी मद्यधुंद बसचालकाला स्थानिक नागरिकांनी धडा शिकवत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे.
बत्ता वसंत रसाळ ( वय ५० वर्षे, रा.वाघोली ) असे अटक केलेल्या बस चालकाचे नाव आहे. पोलिस कर्मचारी प्रशांत भगवान धुमाळ ( वय-३६ ) यांनी फिर्याद दिली. बायफ रोडवरील इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलची ही बस होती

धक्कादायक म्हणजे हा बस चालक बस चालवताना मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकाराने संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला चोपही दिला. या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
