फास्ट टॅगचे नियम बदलले, १ फेब्रुवारी पासून KYV पडताळणी होणार रद्द, नवीन नियमावली काय असणार?, जाणून घ्या…


पुणे : वाहनचालकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. फास्ट टॅग वापराशी संबंधित एक महत्त्वाचा नियम बदलण्याचा निर्णय घेण्यात घेतला आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणार आहे.

या बदलामुळे टोल प्लाझावर होणारा वेळेचा अपव्यय, फास्ट टॅग ॲक्टिव्हेशनमधील अडचणी आणि वारंवार व्हेरिफिकेशनची झंझट मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेषतः कार, जीप आणि व्हॅनसाठी जारी करण्यात येणाऱ्या फास्ट टॅग धारकांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे.

आतापर्यंत फास्ट टॅग ॲक्टिव्ह करताना Know Your Vehicle (KYV) ही अनिवार्य प्रक्रिया होती. या प्रक्रियेत वाहनाची माहिती, नोंदणी क्रमांक, वाहनाचा प्रकार आणि इतर तपशीलांची पडताळणी केली जात होती. मात्र १ फेब्रुवारी २०२६ पासून कार, जीप आणि व्हॅनसाठी KYV व्हेरिफिकेशन प्रक्रिया रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे फास्ट टॅग वापरणे अधिक सोपे, जलद आणि त्रासमुक्त होणार आहे.

नवीन नियमांनुसार फास्ट टॅग संदर्भातील वाहन माहितीची पडताळणी करण्याची संपूर्ण जबाबदारी आता थेट बँकांकडे देण्यात आली आहे. फास्ट टॅग जारी करणाऱ्या बँका वाहनाच्या अधिकृत डेटाबेसच्या आधारे आवश्यक तपासणी करतील.

त्यामुळे वाहनधारकांना वेगवेगळ्या टप्प्यांवर पुन्हा-पुन्हा व्हेरिफिकेशन करण्याची गरज भासणार नाही. टॅग घेतल्यानंतर तो त्वरित ॲक्टिव्ह होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

याशिवाय बँकांच्या शाखा आणि कस्टमर केअर सेंटरच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. या सर्व बाबींचा विचार करून NHAI ने KYV प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहनचालकांना नेमका काय फायदा?

या नव्या नियमामुळे फास्ट टॅग वापरकर्त्यांना अनेक पातळ्यांवर दिलासा मिळणार आहे. FASTag घेण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. टॅग खरेदी केल्यानंतर तो लगेच वापरता येणार असल्याने प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही. कागदपत्रांची तपासणी, अपलोड आणि व्हेरिफिकेशनचा त्रास कमी होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!