उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची कारणे उलगडणार? अपघातातील ढिगाऱ्यातून DGCA तपास करणार…


पुणे : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या विमान अपघाताची माहिती समोर येताचं संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे.आता विमान अपघातातील ढिगाऱ्यातून अपघाताची कारणे उलगडणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास बारामधीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सभांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत होते. मुंबईहून ते बारामतीच्या दिशेनं रवाना झाले असतानाच बारामती विमानतळापासून नजीकच असताना साधारण 500 फूट उंच आभाळात असतानाच हे विमान कोसळलं आणि धुराचे लोट उठले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेला हा अपघात फक्त एक अपघात आहे की एखाद्या मोठ्या चुकीचा परिणाम आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय विमान वाहतूक तज्ज्ञ आणि तपास संस्था आता कसून चौकशी करण्याची तयारी करत आहेत. अवशेष आणि तांत्रिक पुराव्यांमधून काय सत्य बाहेर येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या विमान अपघाताचा आता कसून तपास केला जाणार आहे.तपासाचा मुख्य केंद्रबिंदू अपघात स्थळ असेल. विमानाचे अवशेष, आघाताचे दृष्टीकोन, धावपट्टीपर्यंतचे अंतर आणि कोलणत्याही जळण्याच्या खुणा या सर्वांची काळजीपूर्वक नोंद केली जाणार आहे.

अपघाताचा तपास तांत्रिक बाबींपर्यंत विस्तारला जाईल. ब्लॅक बॉक्स, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरचा वापर उड्डाणाच्या शेवटच्या क्षणांची माहिती सर्व गोष्टींची कसून चौकशी करण्यात येणार आहे. यातून आता अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!