कुख्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीतील गुन्हेगारावर तब्बल 6,455 पानांचे आरोपपत्र दाखल, खतरनाक प्लॅन उघड…..

पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीने शहराच्या विविध भागात अनेक गुन्हे केल्याचे समोर आले आहे.आता या गुन्हेगारीवर कडक कारवाई करत गुन्हे शाखेने नीलेश घायवळ टोळीचा बिमोड करण्यासाठी ६,४५५ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील वर्चस्व गमावल्याने घायवळने गणेश विसर्जनाच्या दिवशीच भयावह कट आखला. 6 सप्टेंबर 2025 रोजी, म्हणजेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी टोळीतील सदस्यांना प्रोत्साहन देताना घायवळने, “तुम्ही फक्त धमाका करा, हत्यारे आणि पैसा मी पुरवतो. कायदेशीर अडचण आलीच तर तुम्हाला सोडवण्याची जबाबदारी माझी,” असे सांगत गुन्ह्यासाठी प्रवृत्त केल्याचे तपासात उघड झाले आहे.
पुण्यातील कोथरूडमध्ये 17 सप्टेंबर रोजी घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार केला होता.याबाबत तपास करताना पोलिसांना महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या घटनेनंतर घायवळ टोळीतील नऊ गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला होता. आता गुन्हे शाखेने 6,455 पानांचा दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल आहे.या आरोपपत्रातून घायवळ टोळीच्या कारस्थानांचे अनेक धक्कादायक उलगडे झाले आहेत.

हा कट गणेश विसर्जनाच्या दिवशी रचल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मयुर ऊर्फ राकेश गुलाब कुंबरे, मयंक-मॉन्टी विजय व्यास, गणेश सतिश राऊत, दिनेश राम फाटक, आनंद अनिल चांदलेकर, मुसाब ईलाही शेख, जयेश कृष्णा वाघ, अक्षय दिलीप गोगावळे, अजय महादेव सरोदे या आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
