ब्रेकिंग! शिक्षक भरतीच्या ‘पवित्र पोर्टल’ प्रक्रियेत 4 मोठे बदल,शिक्षण विभागाचा मोठा निर्णय


मुंबई : राज्यातील शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेत स्पष्टता आणि पारदर्शकता आणण्यासाठी चार मोठे बदल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सरकारने ‘पवित्र पोर्टल’वरील भरती प्रक्रियेत महत्त्वाचे बदल केले आहेत. या निर्णयामुळे टीईटी गुणांचा वापर, वयाच्या अटी,प्राधान्यक्रमांची मर्यादा तसेच सेमी इंग्रजी शाळा मधील शिक्षकांच्या अहर्तेबाबत नव्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने केलेल्या सुधारित नियमांनुसार, चाचणी परीक्षेत मिळालेले गुण आता केवळ एकदाच निवडीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. यामुळे वारंवार गुणांचा वापर करून होणाऱ्या गुंतागुंतीला आळा बसणार आहे.

तसेच उमेदवारांना आता पदभरतीदरम्यान तब्बल ५० प्राधान्यक्रम देण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार शाळा, माध्यम किंवा पदासाठी अधिक पर्याय निवडता येणार आहेत.

तसेच उमेदवाराच्या वयाची गणना अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनुसार केली जाणार आहे. यामुळे वयोमर्यादेबाबत निर्माण होणारे संभ्रम आणि तक्रारी कमी होण्याची शक्यता आहे.

आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे सेमी-इंग्रजी माध्यमासाठी पात्रतेचा विस्तार करण्यात आला आहे. आता इंग्रजी किंवा विज्ञान विषयातील पदवीधारक उमेदवारांनाही सेमी-इंग्रजी माध्यमातील शिक्षक पदांसाठी पात्र मानले जाणार आहे.

राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून राबवली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया राज्य परीक्षा परिषदेकडे असून, त्यासाठी स्वतंत्र सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आता शासन निर्णय जारी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!