पुण्यात भयंकर अपघात ; कामावरून घरी निघाला, वाटेतच फायर ब्रिगेडच्या वाहनाची धडक, चाकाखाली चिरडून…..

पुणे : पिंपरी- चिंचवडमध्ये अग्निशमन दलाच्या भरधाव गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार चाकाखाली चिरडला गेला. या प्रकरणी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड शहरातील रावेतमधील ॲडमविले सोसायटीजवळील स्पाइस डेक चायनीज हॉटेलसमोर अग्निशमन दलाच्या भरधाव गाडीने दुचाकीला धडक दिली आहे.समीर नेहाल खान (वय २८ वर्षे) असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे.
समीर आपल्या साइटवरून त्याच्या घराकडे दुचाकीने जात होता. त्याचवेळी अग्निशमन दलाच्या वाहनाच्या चाकाखाली तो चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत समीरचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

.या प्रकरणात एसपी मुरलीधर कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून रावेत पोलिस ठाण्यामध्ये पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे वाहन चालक वैभव रमेश कोरडे (वय ३२ वर्षे) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम आणि मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिस करत आहेत.
