‘कांचन’ कुटूंबियांनी शोधून काढला पूर्वजांचा पूर्व इतिहास ; नाशिकचा ‘कांचनबारी’ गड ठरला पराक्रमाची साक्ष ; शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीत पराक्रमाची किर्ती वारसांनी उजळली ….


जयदिप जाधव

उरुळी कांचन : शिवकालीन हिंदवी स्वराज्याची निर्मिती व देशाचा स्वातंत्र संग्राम हा प्रत्येक भारतवासियांसाठी अभिमान व शौर्य गाथेचा जाज्वल्य इतिहास बनला आहे. या भूमीसाठी शौर्य भूषविलेल्या स्वातंत्र्य सेनानी व महापुरुषांच्या बलिदानाचा इतिहास हा प्रत्येक भारतीयासाठी ऊर भरुन आणणारा ठरला आहे. या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य निर्मितीत अनेकघराण्यांनी त्यांना साथ देऊन राष्ट्र उभारणीस योगदान उभे केले आहे. अशीच एक इतिहासाची पाळेमुळे खोदून आपल्या पूर्वजांचा छ. शिवरायांबद्दल धर्मनिष्ठा असल्याची इतिहासाची साक्ष शोधून कांचन कुटूंबियांचा वारसांनी आपल्या पूर्वजांच्या स्वराज्याच्या पाईक होण्याच्या या शौर्याला नतमस्तक होण्याचा अभिमान जागविला आहे.

छ. शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य निर्मितीत अनेक कुटूंबियांचा अजोड शौर्याचे दाखले इतिहासात अभिमानाने पाहिले जात आहे. अशाच एका शौर्य गाजविलेल्या कांचन कुंटूंबियांची ऐतिहासिक दाखला त्यांच्या वारसांनी शोधून काढीत या स्वराज्य उभारणीत पूर्वजांनी साक्ष नोंदविल्याचा ऐतिहासिक पाऊल खुना शोधून काढल्या आहेत.

उरुळीकांचन (ता.हवेली)येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी परिचित असली तरी या भूमीत शिवकालीन दुर्लक्षित असलेला इतिहास हा या गावातील इतिहास अभ्यासक श्रीकांत कांचन यांच्यामाध्यमातून समोर आला आहे. या परिवारातील पूर्वजांनी छ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १६७० मध्ये सूरत लुटीत महाराजांनी गाजविलेले शौर्य व या शौर्यात कांचन कुटूंबातील पूर्वजांनी केलेला पराक्रम पुराव्यानिशी समोर आणला आहे.

महाराजांच्या दख्खन प्रांतात मूळचे मध्यप्रदेशात धारचे असलेल्या या कुटूंबियांनी छ. शिवरायांच्या पराक्रमाला साथ दिली या सुरत लूटीत महाराजांनी मोघल सैनिकांचा पाडाव करण्यात या कुंटूंबाने कर्तबगारी दाखवित हा खजिना स्वराज्याच्या स्वाधीन केला. या ऐतिहासिक पराक्रमात या परिवाराच्या शौर्याचा दाखला असलेल्या कांचनगड या नाशिकच्या ईशान्य बाजूला असलेल्या किल्याची ऐतिहासिक साक्ष ठरुन स्वराज्याचा दाखला बनला आहे.

मराठ्यांच्या पराक्रमाची व कांचन कुटूंबाच्या पूर्वजांच्या ऐतिहासिक संदर्भाची व पराक्रमाची शौर्य गाथा पहाण्यासाठी या कुटूंबाच्या वारसांनी कांचनगढ या किल्याला भेट देऊन पूर्वजांना अभिवादन केले आहे. या कुटूंबियांचे अभ्यासक श्रीकांत कांचन यांनी केवळ पूर्वजांचा इतिहास न शोधता या कुटूंबाचे धारातीर्थी पडलेले ऐतिहासिक शौर्य वारसदारांच्या डोळ्यांत साठविले आहे.

इतिहास शोधात त्यांनी नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुका व दक्षिणेस चांदवड तालुकांच्यापायथ्यालाकांचन किल्ला व कांचणे हे छोटसे गाव वास्तव्यास असलेले पूर्वज पाहिले. तर मोघल सरदार दाऊद खान याचा या भूमीत पाडाव केल्याचे शौर्य या ठिकाणी अनुभविले.कांचणे या गावात मुघल काळात बांगड्यांच्या काचेचा खूप मोठा व्यवसाय तसेच बांगड्या ह्या भारतभर व परदेशातील जात होत्या. हे संदर्भ ही त्याठिकाणी देऊन अनुभवले. या भेटीत त्यांना शिवचरित्र अभ्यासक विकास बधे यांनी सुरतची लूट व छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य यांचे व्याख्यान दिले. तर स्थानिक गावकरी योगेश गांगुर्डे यांनी किल्ला व परिसराची माहिती दिली. या पूर्वजांची इतिहासउत्तर पवार आडनावाशी झालेला बदल तर त्यानंतर कांचन आडनावात झालेला बदल हा ऐतिहासिक संदर्भ जाणून घेतला.

शिवरायांच्या ऐतिहासिक गड किल्यांना वर्ल्ड हेरीटेज हे ऐतिहासिक मानांकन मिळाले आहे. हा प्रत्येक भारत वासियांसाठी अभिमानाचा क्षण असताना शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीत अशा ऐतिहासिक साक्ष असलेल्या कुटूंबियांची कर्तबगारी इ.स.पू. ४०० वर्षानंतर प्रत्यक्ष पुढे आल्याने या पूर्वजांचा प्रताप हे कुटूंब अभिमानाने अनुभवत आहे.

” छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासात कांचन कुटूंबियाचे शौर्य दडले होते. हा पराक्रम हा कांचन कुटूंब व परिवारास परिचित व्हावा म्हणून या इतिहासाची ओळख करुन देणे हे कर्तव्य होते. या स्वराज्याच्या लढाईत पूर्वजांचे योगदान हे आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असून हा इतिहास पुस्तक रुपात आणण्याचा मानस आहे”

– श्रीकांत कांचन, इतिहास अभ्यासक

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!