लाडकीच्या खात्यावर मतदानाआधी ३००० रुपये येणार ; भाजप महिला नेत्याचा दावा

पुणे :राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना प्रचाराला देखील जोर चढला आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.महापालिका निवडणुकीआधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर ३,००० रुपये जमा होतील, असा दावा भाजप नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याच्या हप्त्यांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रातीचा सण आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या कालावधीतच लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3000 रुपये जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.त्यातच भाजप नेत्या तेजस्वी घोसळकर यांनी केलेल्या दाव्याने याला आणखी पाठबळ मिळाले आहे.
मुंबईच्या वॉर्ड २ मधून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसळकर यांचा सामना ठाकरे बंधूंच्या संयुक्त उमेदवार धनश्री कोळगे यांच्याशी आहे. धनश्री या शिवसेनेच्या युवा सेनेची (युवा सेना) पदाधिकारी आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण सासरे अजूनही ठाकरेंसोबतच आहेत. या वॉर्डमध्ये काय निकाल लागेल याकडे मुंबईकरांचे लक्ष लागलेय.

मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. मुंबई आणि पुणे या दोन महापालिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र या महापालिका निवडणुकीआधीच लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट मिळणार आहे.