गुन्हेगाराच्या पत्नीला उमेदवारी का दिली? अखेर अजित पवार यांनी मौन सोडलं, केले मोठे विधान..

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शहरात मोठ्या घडामोडी घडल्या. पुण्यातून अजित पवार गटाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना पक्षाकडून अधिकृतउमेदवारी दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अजित पवार गटाकडून बंडू आंदेकरची सून सोनाली आंदेकर, भावजय लक्ष्मी आंदेकर आणि कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या पत्नीला जयश्री मारणेला तिकीट देण्यात आले आहे.
दरम्यान, कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्यार टीका होत आहे. अजित पवार यांनी सुरुवातीला संबंधित जागा ही आरपीआयचे सचिन खरात यांच्यासाठी देण्यात आली होती. त्यांनी तिथे उमेदवारी दिली असल्याचं अजित पवार म्हणाले होते.

यानंतर अजित पवार यांनी आज सचिन खरात यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. सचिन खरात यांनीच तिथे संबंधित उमेदवाराला संधी दिल्याचं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

सर्वांच्या उमेदवारांच्या याद्या आहेत. इतरांच्या उमेदवारांच्या याद्यांमध्ये नावे कशी आहेत? मी माझ्या मित्रपक्षांना काही जागा देतो. त्यावर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मी माझ्या पक्षाची उमेदवारी दिलेली नाही.
आरपीआयचे सचिन खरात आणि सीताराम गंगावणे यांनी सांगितले की, आमचं चिन्हे त्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागेल. आम्हाला आमचे जरी उमेदवार असले तरी घड्याळ चिन्ह द्या. हे असं अनेक निवडणुकीत होत असते, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली.
तू समजा गुन्हेगार आहे. तू नाहीय. पण आता तू प्रश्न विचारला. तू समजा गुन्हेगार आहेस. तू काहीतरी मोठा गुन्हा केला. तुझ्या पत्नीचा त्यात काही दोष आहे का? उद्या मी काही गुन्हा केला तर त्याच माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझा मुलांचा, मुलींचा किंवा सूनांचा काय दोष आहे? असं नाहीय.
जर एखाद्याने हत्या केली तर त्याचं संपूर्ण खानदान त्याला जबाबदार आहे, असं म्हणण्याचे कारण नाही. ती विकृती असते. काही चुकीच्या गोष्टी असतात, असे अजित पवार म्हणाले.
