भयंकर! ६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, गच्चीवरुन फेकून चिमुकलीला संपवलं, घटनेने संपूर्ण देश हादरले..

उत्तर प्रदेश : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरले आहे.
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये ६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. घटना २ जानेवारीच्या संध्याकाळी घडली. गुन्हा उघडकीस येईल या भीतीनं त्यांनी मुलीला तिसऱ्या मजल्यावरुन फेकलं. त्यात तिचा मृत्यू झाला.
राजू आणि वीरु कश्यप अशी आरोपींची नावं आहेत.

पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याच इमारतीत भाड्यानं राहणाऱ्या दोन भाडेकरुंनी, राजू आणि वीरु यांनी मुलीवर अत्याचार केला. राजू बलरामपूरचा रहिवासी आहे. तर वीरु मूळचा लखीमपूर खिरीचा आहे. मुलगी गच्चीवर खेळत असताना दोघांनी तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान, गुन्हा उघडकीस येईल या भीतीनं त्यांनी मुलीला तिसऱ्या मजल्यावरुन फेकलं तिसऱ्या मजल्यावरुन फेकण्यात आल्यानं मुलगी गंभीर जखमी झाली. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सुत्रं हलवली.
आरोपींना घेरण्यात आलं. तेव्हा आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला. त्यात दोन्ही आरोपींच्या पायांना गोळी लागली. यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
