कोरेगावमूळ पंचायत समिती गणात कृषीराज उर्फ मनोज चौधरी यांच्या उमेदवारीने रंगत! राष्ट्रवादीकडून तयारीचा वेग, मतदारांचा पाठिंबा व राजकीय बलस्थानांनी पारड जंड…


उरुळीकांचन : कोरेगावमूळ पंचायत समिती गणात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून तीव्र इच्छुक असलेल्या नायगाव विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष कृषीराज उर्फ मनोज चौधरी यांच्या तयारीने पंचायत समिती गणातील राजकीय चित्र बदलून गेले असून तयारीचा वेग, मतदारांचा प्रतिसाद व राजकीय बलस्थाने मनोज चौधरी यांच्या बाजूने असल्याने या गाणात त्यांचे पारडे जड झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

केसनंद – कोरेगावमूळ जिल्हा परिषद गटात कोरेगावमूळ पंचायत समिती गण सर्वसाधारण जागेसाठी खुला झाल्याने या गणात तीव्र चुरस निर्माण झाली आहे. इच्छुकांनी या गणात विजयासाठी सर्व हत्यारे उपसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागली आहे.अशातय या लढाईत कोरेगाव मूळ गणात मनोज चौधरी यांचे नाव समोर आल्याने तालुक्याच्या भुवय्या या गणात उंचावल्या आहेत.त्यातच त्यांनी तयारीची संपूर्ण आयुधे वापरण्यास सुरुवात केल्याने त्यांच्या उमेदवारी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

उच्च शिक्षित व विद्याभूषित नेतृत्व म्हणून ते यापूर्वीच ते तालुक्यात परिचित आहे. सहकार क्षेत्रातील हवेली तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून त्यांनी आपले कार्य केले आहे. तसेच नायगाव विविध सेवा सोसायटीचे अध्यक्षपद म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा व सोसायटीचा अर्थिक कार्यभार उंचावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तर सद्यस्थितीत यशवंत सहकारी साखर कारखान्याचा उर्जितावस्थेत चालू करण्याच्या सर्व प्रयत्नात ते संचालक मंडळाच्या सोबतीत असल्याने संचालक मंडळाने त्यांना पाठिंबा दर्शवून त्यांच्या प्रचारात पाठिंबा देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

सहकाराच्या माध्यमातून वडील दत्तात्रय उर्फ बाळासाहेब चौधरी यांच्या माध्यमातून त्यांनी नायगाव विविध विकास सेवा सोसायटी, स्व. हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ पतसंस्था तसेच नायगाव, पेठ, सोरतापवाडी, प्रयागधाम या ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा परिसरावर विशेष अंमल असल्याने त्यांनी विकासाचे मोठे योगदान उभे केले आहे.

       

मनोज चौधरी यांच्या उमेदवारीबाबत ‘यशवंत’चे संचालक विजय चौधरी म्हणाले, पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या उमेदवारीबाबत आश्वासित करण्यात आले असून तरुण व सुसंस्कृत उमेदवार हा सहकार, सामाजिक, सांप्रदायिक क्षेत्रात प्रभावी काम करणार असल्याने त्यांना मतदारांचे पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!