नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोनं सुसाट, किती हजारांनी महागलं? जाणून घ्या…

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.
त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याने नव्या वर्षात दर कमी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे अनेक ग्राहक स्वस्तात दागिने खरेदीसाठी वाट पाहत होते. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत असून, बाजारात पुन्हा एकदा तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, २ जानेवारी २०२६ रोजी सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. विशेष म्हणजे, सोने महागले असताना चांदीच्या दरात मात्र घसरण झाल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १०० ग्रॅम तब्बल ११,४०० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे १०० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १३,५०,६०० रुपयांवरून थेट १३,६२,००० रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,३५,०६० रुपयांवरून वाढून १,३६,२०० रुपये इतका झाला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, सांगली आणि बारामती या प्रमुख शहरांमध्ये समान दर नोंदवण्यात आले आहेत.
२२ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १०० ग्रॅम १०,५०० रुपयांची वाढ झाली असून, १०० ग्रॅम सोन्याचा दर १२,३८,००० रुपयांवरून १२,४८,५०० रुपये झाला आहे. तर १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,२३,८०० रुपयांवरून वाढून १,२४,८५० रुपये इतका झाला आहे. त्यामुळे लग्नसराई आणि दागिने खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांची चिंता वाढली आहे.
१८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ कायम असून, प्रति १०० ग्रॅम ८,६०० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे १८ कॅरेट सोन्याचा १०० ग्रॅम दर १०,१२,९०० रुपयांवरून १०,२१,५०० रुपये झाला आहे. तर १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याचा दर १,०१,२९० रुपयांवरून वाढून १,०२,१५० रुपये झाला आहे.
चांदीच्या दरात घसरण…
सर्व कॅरेटमध्ये दरवाढ झाल्याने सोन्याचा बाजार तेजीत असल्याचे स्पष्ट होत आहे. सोन्याच्या दरात तेजी असताना चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. चांदीचा दर कमी होऊन २,३७,९०० रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
