मुंबईत मनसेला मोठा धक्का ;पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या 11 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा


मुंबई :मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली असताना आता वांद्रे येथील मनसेच्या बालेकिल्ल्यात पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या प्रभाग क्रमांक ९७ आणि ९८ मधील तब्बल ११ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीआधी मनसेला मोठा धक्का बसला आहे.

आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या ‘मशाल’ चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरवल्याने पक्ष निर्मितीपासून निष्ठावंत राहिलेले मनसैनिक नाराज झाले. यातूनच त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. या बंडाचा मनसेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वांद्रे येथील प्रभाग क्रमांक ९७ आणि ९८ मध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा वाद झाला. याठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार बाळा चव्हाण हे ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे, मनसेच्या वतीने दिप्ती काते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इथं ठाकरे बंधुची युती झाली असली तरी याच प्रभागामधून मनसेकडून इच्छुक असणाऱ्या निष्ठावंताना डावलल्याची भावना आहे. यातूनच अनेक वर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत.

मनसेच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा?

       

विजय काते- उपविभाग अध्यक्ष
नरेंद्र कौंडिपुजला – उपशाखा अध्यक्ष
प्रविण पाटील- उपशाखा अध्यक्ष
रोहित गोडीया-उपशाखा अध्यक्ष
अजय कताळे- उपशाखा अध्यक्ष
जितेंद्र गावडे – शाखा अध्यक्ष
भाऊराव विश्वासराव – शाखा सचिव
विजय कुलकर्णी- उपशाखा अध्यक्ष
अॅड. अशोक शुक्ला – उपशाखा अध्यक्ष
दत्ताप्रसाद देसाई -उपशाखा अध्यक्ष

या राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या १९ वर्षे ९ महिन्यांपासून राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. मनसेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या या सैनिकांनी अचानक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!