सलग पाच दिवस बँका बंद ; कामे उरकून घेण्यासाठी फक्त एकच दिवस…!
मुंबई : देशभराती बँका २६ जानेवारी आणि सलग चार दिवस म्हणजे एकूण ५ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे सर्वानी आपले बँकेचे महत्वाचे काम असल्यास ते शुक्रवारीच करून घ्यावे लागेल. शुक्रवारनंतर पुढील चार दिवस बँका बंद असणार आहेत.
युनिअन फोरम ऑफ बँक युनिअनने संपाचा इशारा दिल्ला असल्याने पुढील आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी सर्व बँक बंद असतील
त्यामुळे सर्वसामान्यांची अनेक कामं खोळंबली जाऊ शकतात बँकेतील एखादं महत्त्वाचं काम तुम्ही प्रलंबित ठेवलं असेल तर तातडीने उरकून घ्या. उद्या म्हणजेच गुरुवारी 26 जानेवारी असल्याने बँकांना सुट्टी आहे.
त्यामुळे तुमच्याकडे बँकेचं एखादं महत्त्वाचं काम असेल तर फक्त शुक्रवारच उपलब्ध आहे. त्यानंतर पुढील चार दिवस देशातील सर्व बँका बंद असणार आहेत. युनिअन फोरम ऑफ बँक युनिअनने संपाचा इशारा दिला असल्याने बँकेची अनेक कामं अडकून राहण्याची शक्यता आहे