ब्रेकिंग! जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला? निवडणूक आयोगाकडून ‘या ‘तारखांची चर्चा

पुणे: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगात हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद निवडणुकांचे मतदान 25 जानेवारीच्या आसपास होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार,आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेऊन मतदानाच्या तारखा ठरवण्यात येणार असून, 25 जानेवारी ही तारीख अडचणीची ठरल्यास 28 जानेवारी रोजी मतदान घेण्याचाही पर्याय चर्चेत आहे. 28 जानेवारी हा बुधवार असल्याने त्या दिवशी मतदान घेणे मतदारांसाठी अधिक सोयीचे ठरेल, असे मतही व्यक्त करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 6आणि 7जानेवारी रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम उपलब्ध असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून दिली आहे

दरम्यान 8 महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदांचे क्षेत्र समान असल्याने सध्या आचारसंहिता लागू करण्यात आलेली नाही. मात्र, 6 आणि 7 जानेवारीच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

