ब्रेकिंग,! जिल्हा परिषदेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी…. ; अजित पवारांचे मोठे संकेत


पुणे : राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असताना अखेरच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समितिच्या निवडणुका महिनाअखेरला जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर आणि अमरावती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, ज्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. ८ जानेवारीच्या आतमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच शक्यता आहे.

सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील, अशी माहिती समोर आली आहे.६ ते ८ जानेवारीच्या दरम्यान आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ३१ जानेवारीनंतरच होतील, असे समोर आले आहे.

       

दरम्यान विदर्भातील जिल्हा परिषद, उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद,कोकणातील जिल्हा परिषद पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद आहेत. ते आरक्षण 50 टक्के पर्यंतच घ्या, अशा सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. 50% च्या आत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील, असे अजित पवार म्हणाले.आता जिल्हा परिषदेची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!