आनंदाची बातमी! राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना ‘या’ दिवशी मिळणार पगारी सुट्टी, अन्यथा…


पुणे : राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी, बँक कर्मचारी आणि प्रायव्हेट ऑफिसेसमधील सर्व कर्मचाऱ्यांबद्दल महत्त्वाची बातमी आहे. अवघ्या काही दिवसांवरच राज्यामध्ये अनेक महानगरपालिकांमध्ये निवडणूका आहेत. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच कर्मचार्‍यांना यंदाची संक्रांत पावली आहे.

१५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व मतदार कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे मतदान करावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे यांच्यासह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांमध्ये या दिवशी मतदान होणार आहे. या सर्व महानगरपालिका क्षेत्रांतील नोंदणीकृत मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू राहणार असून, ते सरकारी, निमसरकारी किंवा खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत असले तरी त्यांना पगारी सुट्टी देणे बंधनकारक असणार आहे.

       

हा निर्णय राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने संयुक्तपणे घेतला आहे. 18 वर्षांवरील नोंदणीकृत मतदार असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामगार या पगारी सुट्टीस पात्र असतील. मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा दबाव न येता कर्मचारी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

१५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्या दिवशी संबंधित सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याबाबत आधीच नियोजन करावे, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार यावेळी विशेष लक्ष देताना दिसत आहे.

दरम्यान, लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ मधील कलम 135 (बी) नुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना आवश्यक सवलत देणे बंधनकारक आहे. मात्र मागील काही निवडणुकांमध्ये अनेक खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी न दिल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे मतदानाचा टक्का कमी होऊ नये म्हणून यावेळी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!