केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘या ‘वेदनाशामक औषधाची विक्री करण्यास बंदी

पुणे : वेदनाशामक आणि तापावरील औषध म्हणून वापरण्यात येणाऱ्या नीमसुलाईडवर (Nimesulide )औषधाच्या गोळीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही औषधे मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचे सांगत सरकारने त्याच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर निर्बंध लादले आहेत.

केंद्र सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या समितीने या औषधाच्या वापरावर बंदी घालण्याची शिफारस केली होती.निमेसुलाईड या औषधांचा प्रौढांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी केंद्र सरकारच्या स्वास्थ्य मंत्रालयने गेल्यावर्षी ही समिती नेमली होती. याबाबत ड्रग टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्ड आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था ने शिफारस केली होती. या औषधाचा रुग्णांच्या यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

त्यानुसार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली. त्यानुसार शंभर मिलिग्रॅम पेक्षा जास्त क्षमतेच्या निमेसुलाइड गोळ्यांच्या वापरामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. त्याचा गंभीर परिणाम यकृतावर होऊ शकतो. त्यामुळे आता केंद्र सरकारने यावर बॅन आणला आहे. औषधाने सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या कलम 26 अंतर्गत या औषधावर बंदी लागू करण्यात आली आहे.

कायदेशीर कारवाई आणि तांत्रिक सल्ला ड्रस टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्डाची चर्चा केल्यानंतर या औषधावरील बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमावलीतील बदलाची संकेत मंत्रालयाने 1945 ड्रस नियमावली मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव देणारी स्वतंत्र अधिसूचना काढली आहे. त्यानुसार नियमन अटीमधून सूट मिळालेल्या औषधांच्या शेडूल के मधील एका विशिष्ट नोंदीतून स्थिर हा शब्द वगळण्याचा प्रस्ताव आहे. या बदलामुळे बाधित होणाऱ्या घटकांकडून पुढील 30 दिवसात हरकतीने सूचना मागवण्यात आल्या असून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
