वातावरण तापलं! छत्रपती संभाजीनगरच्या भाजप कार्यालयासमोर हायव्होल्टेज ड्रामा, उमेदवारी न मिळाल्याने आक्रोश अन भोवळ….

छत्रपती संभाजीनगर : राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना आता जवळजवळ सर्वच पक्षानी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारीवरून आता कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं आहे. या निवडणुकीसाठीचे एबी फॉर्म दाखल होण्यास आता अवघे काही तास राहिले असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा हायहोल्टेज ड्रामा रंगला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाबाहेर राजकीय वातावरण चांगलंचं तापलं आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यावर सुद्धा उमेदवारी न मिळाल्याने महिला उमेदवारांनी मोठा गदारोळ घातला. तर काही पुरुष उमेदवारांनी बाहेर टाकलेल्या पेंडॉलमध्येच ठिय्या दिला. यावेळी महिलांना भोवळ आली.
तरी वॉर्ड क्रमांक 22 मध्ये इच्छुकांना उमेदवारी नाकारल्याने उमेदवाराला अश्रू अनावर झाले. तर त्याच्या पत्नीला भावना आवरता आल्या नाही. तर दुसरीकडे इतर वॉर्डातील महिला उमेदवाराने सुद्धा मोठा राडा घातला.

तसेच महिला उमेदवाराने पैसे घेऊन तिकीट वाटप झाल्याचा आरोप केला. गेल्या 15 वर्षांपासून भाजपसाठी राबराब राबलो. पण आता तिकीट वाटपाच्या वेळी पक्षात नवीन आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. पैसे घेऊन हे तिकीट वाटप झाल्याचा आरोप यावेळी तिकीट कापलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षावर केला. आता भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारीवरून राजकीय वातावरण चांगलंचं तापलं आहे.

