पेठ येथील संपत चौधरी खूनप्रकरणी दोघा आरोपींना सोलापूर येथून अटक; पुर्ववैमनस्यातून कोयत्याने निर्घृण खून; उरुळीकांचन पोलिस ठाण्यात पहिली मोक्काची होणार कारवाई…


उरुळी कांचन : मित्रांच्या जुन्या वादाच्या कारणातून कोयत्याने निर्घृण खून करुन गेली दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व उरुळी कांचन पोलिसांनी सोलापूर येथून बेड्या ठोकल्या आहेत.

स्वप्निल शिवाजी चौधरी व आदेश रेवलनाथ चौधरी रा. दोघेही नायगाव, पेठ (ता. हवेली) असे खून करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तर संपत तुकाराम चौधरी (वय ४८, रा. वडाचीवाडी पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी यश संपत चौधरी यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी (दि. १९) उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १९) रोजी पेठ गावच्या हद्दीत, थेऊर-पेठ रोडलगत म्हसोबा मंदिराजवळील शेतात संपत चौधरी यांचा अज्ञात व्यक्तींनी हत्याराने मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

       

सदर गुन्ह्याचा तपास केल्यानंतर पूर्वीच्या वादातून स्वप्नील चौधरी व आदेश चौधरी यांनी संपत चौधरी यांना गाठून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करुन निर्घृण खून हे आरोपी फरार झाले होते. ते मध्यप्रदेशात (उज्जैन) व सोलापूर येथे शोध घेण्यात येत होता. तांत्रिक तपासाच्या आधारे व मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना सोमवारी (दि. २९) सोलापुर येथे असलेबाबत माहीती प्राप्त झाल्यानंतर त्यांना उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे पोलिस सचिन वांगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथकांनी आरोपींना अटक केली आहे.

आरोपींवर मोक्काची कारवाई…

या खून प्रकरणातील दोघाही आरोपींवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मारामारी, खंडणी सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने यापूर्वी गुन्हेगारी पाहता या आरोपींवर उरुळीकांचन पोलिस ठाण्याकडून मोक्का अंतर्गत तयार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!