लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! आदिती तटकरेंनी पोस्ट शेअर करत दिली महत्त्वाची अपडेट…


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे अद्याप जमा न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तांत्रिक प्रक्रियेबाबत एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व भगिनींना एक विशेष विनंती केली आहे. योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहण्यासाठी लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला खात्यात ३००० रुपये येणार की तीन महिन्यांचे एकत्रित ४५०० रुपये जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच ही प्रशासकीय पूर्तता करणे गरजेचे असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

       

तसेच या प्रक्रियेसाठी ३१ डिसेंबर २०२५ ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. आता हाताशी केवळ ४ दिवस उरले असून, ज्या महिलांची ही प्रक्रिया अपूर्ण असेल त्यांना दरमहा मिळणारे १५०० रुपये बंद होण्याची दाट शक्यता आहे.

प्रशासकीय कारणांमुळे आतापर्यंत जवळपास ४० लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे उर्वरित पात्र महिलांनी त्वरित ही कार्यवाही उरकून घ्यावी.

आदिती तटकरे यांनी केले आवाहन…

ज्या महिलांनी अद्याप आपले प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही, त्यांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन ही प्रक्रिया पार पाडावी. पोर्टलवर आधार क्रमांक आणि विचारलेली वैयक्तिक माहिती अचूक भरून पडताळणी करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये पती किंवा वडिलांच्या माहितीचीही आवश्यकता भासू शकते. सर्व कागदपत्रांची आणि माहितीची पूर्तता करून घोषणापत्र सादर केल्यावरच ही प्रक्रिया यशस्वी मानली जाईल.

जर विहित मुदतीत ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर पुढील महिन्यापासून अनेक लाभार्थ्यांचे नाव यादीतून कमी केले जाऊ शकते. सरकारने ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिली असून, मोबाईल किंवा सेतू केंद्रावरूनही महिला ही माहिती अद्ययावत करू शकतात. आपला हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी ही शेवटची संधी असल्याचे सांगत मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना तात्काळ कृती करण्याचे आवाहन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!