पुण्यातील नामांकित ‘द नॉयर’ पबमध्ये पोलिसांची धाड ; ५२ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यासारख्या शहरांमधून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढत आहेत.अशातच आता विमानगर परिसरातील एका पबमध्ये बेकायदा सुरू असलेल्या पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी महिला आणि पुरुष अशा पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर पब मालक अमरजित सिंग संयु याच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील नामांकित असणाऱ्या द नॉयर पबमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. अधीक्षक अतुल कानडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. येथून ३ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आता आहे.

विमाननगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कोणताही परवाना न घेता हॉटेल द नॉयर (रेड जंगल) एअरपोर्ट रोड, येथे पार्टी सुरू असल्याची माहिती अधीक्षक कानडे यांना मिळाली होती . त्यानुसार पथकाने छापा टाकला.

यावेळी विदेशी मध्याच्या 178 बाटल्या मिळून आल्या. अवैध मद्य व्यवसाय चालू ठेवण्या वापरलेले साहित्य खुर्ची, सोफा, लाकडी टी पॉय, लोखंडी, स्पिकर, साऊंड, लॅपटॉप, एक संगणक, काचेचे ग्लास, फॉग मशीन इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.
या गुन्हयामध्ये एकुण ५२ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.त्यापैकी दोन आरोपी पब चालक व व्यवस्थापक यांचा शोध सुरु असून फरार घोषित करण्यात आले आहे.
