मोठी बातमी! पुण्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला, कोणाला किती जागा?

पुणे:राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या लगबग सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आता पुण्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) हे तिन्ही पक्ष प्रत्येकी ५० -५० जागावर लढणार आहेत. आज परत एकदा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होणार आहे.त्यानंतर महाविकास आघाडी आज सायंकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत जागांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिका निवडणुकांसाठी गेल्या दोन दिवसापासूनं पुण्यात महाविकास आघाडीचे बैठका सत्र सुरू आहे.त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे जागा वाटपाबाबत एकमत झाल्याची माहिती आहे.त्यानुसार या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) हे तिन्ही पक्ष प्रत्येकी ५० -५० जागावर लढणार आहेतमहापालिका निवडणूक लढवण्यास महाविकास आघाडी जागा वाटपाचे सूत्र अखेर जवळपास निश्चित झाल आहे.

दरम्यान मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत अजून भुमिका नाही. आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तिन्ही प्रमुख पक्ष ५० जागा निवडणूक लढवणार आहेत. उर्वरित जागा समविचारी मित्र पक्षांना देण्यावर आघाडीचे एक मत झाल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे पुण्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युतीच्या चर्चेला वेग आला आहे. अजित पवार शिवसेनेला ४०-४५ जागा देण्यास तयार आहेत. दुसरीकडे जागा वाटपात भाजप आणि शिवसेना यांच्यात तोडगा निघत नसल्याने युती तुटणार अशी शक्यता आहे.
