महाराष्ट्रावर मोठं संकट ; पुढचे 6 दिवस धोक्याचे, हवामान खात्याचा मोठा इशारा…

पुणे :सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अख्खा महाराष्ट्र सज्ज झाला असताना थंडीचा जोर कायमच राहणार आहे.महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून, नवीन वर्षातही गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढलेला दिसत असून पुढचे काही दिवस वातावरण असंच असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मुंबईसहर राज्यात काही ठिकाणी पुढले 6 दिवस तापमानात घट होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

डिसेंबर महीना संपत आला असून काही दिवसांतच नव्या वर्षाची पहाट उगवेल. मात्र देशभरासह राज्यात अजूनही थंडीचा जोर कायम असून सकाळी आणि रात्री हुडहुडी भरायला वातावरण असलं तरी दिवस वर चढल्यावर सूर्यनारायणाच्या दर्शनाने थोडं उबदार वाटतं. रात्री उशीरा गार वारे वहात असून पहाटेही गारवा चांगलाच वाढलेला दिसतोय.

उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये थंडीचा अलर्ट जारी केल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली गेले असून त्यामुळे नागरिकांना मात्र चांगलीच हुडहुडी भरली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही दिवस उरले असताना थंडीचा कडाका कायम असणार आहे.
संपूर्ण उत्तर आणि ईशान्य भारतात हवामानाने रौद्र रूप धारण केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये 1 जानेवारी 2026 पर्यंत दाट धुक्याचा इशारा देण्यात आला.मात्र उत्तर भारतातील या बदलत्या हवामानाचे पडसाद हे महाराष्ट्रावरही पडू शकतात आणि इथल्या हवामानातही बदल होऊ शकतो. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातही थंडीचा जोर कायम राहू शकतो.
