शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भूकंप ; उरले फक्त 24 तास, भाजपचा शिवसेनेला शेवटचा अल्टीमेटम


मुंबई : महापालिका निवडणुका तोंडावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मोठा राजकीय भूकंप येणार आहे.ठाणे, कल्याण-डोंबिवलीसाठी मागील काही दिवसांपासून अगदी पहाटेपर्यंत बैठका सुरू आहेत. मात्र अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. अशात आता भाजपनं शिवसेनेला शेवटचा अल्टीमेटम दिलाआहे. तोडगा काढण्यासाठी फक्त 24 तास त्यांच्याकडे उरले आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. एकत्र निवडणूक लढण्याची घोषणा झाली असली तरी या चारही महानगर पालिकांमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तरीही जागा वाटपाचं सूत्र ठरलं नाही.

ठाण्यात शिवसेना ८७ ते ९२ जागावर निवडणूक लढवेन. तर भाजप ३५ ते ४० जागा लढवेन. काही जागांवर उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. ⁠ठाणे महापालिकेत ३ ते ५ जागांवर युतीचं घोडं अडून आहे. तर केडीएमसीत ५ ते ७ जागांवरुन भाजपा शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. ⁠उद्या रात्री पुन्हा युतीची बैठक होणार आहे. ही बैठक निष्पळ ठरली तर भाजप स्वबळावर मैदानात उतरू शकते, अशी माहिती आहे. ⁠

       

ठाणे महानगरपालिकेसाठी भाजपाने काही ठिकाणी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. ठाण्यात जवळपास १६ ठिकाणी ठाणे भाजपाच्यावतीने बॅनरबाजी करण्यात आलीये. विविध केंद्रीय आणि राज्य सरकारच्या योजनांचा उल्लेख या बॅनरवर असून एक प्रकारे ठाणे भाजपाने निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकलंय. शिवसेनेकडून अजून अंतिम प्रस्ताव आला नसल्याने आणि प्रचाराकरता थोडाच वेळ उरल्याने भाजपाने स्वतंत्र प्रचार सुरू केला आहे. यामुळे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!