ब्रेकिंग! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिस्कटली; अजित पवारांच्या ‘त्या’ प्रस्तावावर शरद पवार नाराज

पुणे :राज्यात महापालिका निवडणुकीच बिगुल वाजलं असताना,पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा होती. त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठकांच सत्र सुरु होतं. मात्र आता दोन्ही राष्ट्रवादीं एकत्र येण्याची युती फिस्कटली असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची पुण्यात रात्री बैठक झाली. काल अजित पवारांच्या निवासस्थानी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल कोल्हे आणि रोहित पवार हे चर्चा करण्यासाठी गेले होते.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन पेच होताच. पण सोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या पक्षाला घड्याळ चिन्हावर लढण्याची ऑफर दिली की, ते हा प्रस्ताव मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यात जमा असल्याची माहिती समोर आली आहे. घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा अजित पवारांनी प्रस्ताव दिला होता. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नाही, आज दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याबद्दल सूतोवाच केलं जाऊ शकतं.

दरम्यान काल रात्री महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. मविआ मनसेला पुणे महापालिका निवडणुकीसाठी सोबत घेणार का? हे लवकरच समजेल. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी प्राथमिक चर्चा झाल्या होत्या. तीन बैठका झाल्या होत्या. दरम्यान युतीच्या चर्चा फिस्कटली असून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतून लढण्याची शक्यता आहे.

