पुण्यात नव राजकीय समीकरण ; ना शिंदे गट, ना ठाकरे गट, प्रशांत जगतापांचा अखेर काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश


पुणे :गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आता पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्याने प्रशांत जगताप नाराज होते. त्यानंतर आज त्यांनी मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

प्रशांत जगताप यांना पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर विविध पक्षांकडून ऑफर देण्यात आली होती. मात्र पुरोगामी विचारधारेशी ठाम असणाऱ्या पक्षासोबत आपली पुढील राजकीय वाटचाल असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज मुंबईतील टिळक भवनात जगताप यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे

       

भाजपची साथ देणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय होत असले तर मी बाजूला होतो, अशी भूमिका घेत प्रशांत जगताप यांनी पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संविधान रक्षणासाठी लढणाऱ्या आणि पुरोगामी विचारांशी एकनिष्ठ असलेल्या पक्षात मी प्रवेश करेन, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज त्यांनी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!