भाजपच्या कुबड्या नकोच, अजितदादांचा स्वबळाचा नारा, महायुतीची डोकेदुखी वाढणार?, नेमकं काय घडतंय?


पुणे : भाजपसह शिंदेसेनेशी सूर न जुळल्याने महापालिका निवडणुकीत दादा गटाने एकला चलो रे चा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. नैसर्गिक युतीचा घटक नसल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादी एकटी पडल्याचे चित्र आहे.

अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अनेक महापालिका युती सोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महायुतीविरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

तर काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना दादांच्या राष्ट्रवादीचे बळ मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील या महापालिकेत दादांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

       

मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबिवली,वसई विरार,मिरा भाईंदर,अमरावती,पुणे पिंपरी, नाशिक, सोलापूर महापालिका एनसीपी अजित पवार पार्टी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना भाजपा एकत्र लढत असल्याने अनेक ठिकाणी एनसीपीची इच्छा असून ही जागा वाटप स्थान नसल्याने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय अजितदादांच्या राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे आता अनेक महापालिकांमध्ये महायुतीमध्ये सुद्धा टक्कर दिसू शकते. काही ठिकाणी हा सामना अधिक चुरशीचा होऊ शकतो.

नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीने करिष्मा करुन दाखवला आहे. राजकीय विश्लेषकांना सुद्धा दादांच्या राष्ट्रवादीच्या कामगिरीची दखल घ्यावी लागली आहे. मराठवाड्यात तर शिंदे सेनेचा बालेकिल्ला असतानाही राष्ट्रवादीने मोठी धडक मारली आहे.

भाजपनंतर राष्ट्रवादी क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे महापालिकेतही स्थानिक नेत्यांनी कुणाशी आघाडी आणि युती नको असा सूर आळवला आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेसेनेकडून सन्मानजनक जागा मिळण्याची चिन्ह न दिसल्याने आता दादांची राष्ट्रवादी ताकद दाखवण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!