पुण्यात राजकीय वातावरण तापलं ; अजित पवारांची एक खेळी, 3 पक्षात वादाचा भडका


पुणे :राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशातच पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती समोर येताच महाविकास आघाडीत वादाचा भडका उडाला आहे.

पुणे महानगरपालिकेसाठी अजित पवारांनी शरद पवार गटाला साद घातली आहे. ही निवडणूक एकत्र लढण्याच्या दिशेनं दोन्ही पक्षाचे नेते चर्चा करत आहेत. पण अजित पवारांच्या या खेळीमुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे.अजित पवार गटासह शरद पवार गट आणि काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामास्त्र उगारलं आहे.त्यांनी पुरोगामी विचारांचा दाखला देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असुन ते राजीनाम्यावर ठाम राहिले आहेत. आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट अजित पवारांना सोबत घेण्यास तयार नसल्याचं चित्र अनेक ठिकाणी आहे. स्थानिक भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते अजित पवारांना सोबत घेण्यास विरोध करत आहेत. यामुळे अजित पवारांना आता वेगळा पर्याय शोधावा लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

       

दरम्यान काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने अजित पवारांना रेड सिग्नल दाखवल्याची देखील चर्चा आहे. एकूणच अजित पवारांनी शरद पवारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याने पुण्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!