आधार-पॅन कार्ड आताच करा लिंक! शेवटचे काही दिवस उरले, सरकारने दिला मोठा अल्टिमेटम…


पुणे : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे देशातील सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र मानले जातात. पॅन कार्डशिवाय कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करणे शक्य नाही. बँकिंग, कर भरणा, गुंतवणूक, सरकारी तसेच निमशासकीय कामांसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.

मात्र आता जर वेळेत एक महत्त्वाचं काम पूर्ण केलं नाही, तर पॅन कार्ड थेट निष्क्रिय होण्याचा धोका निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत जाहीर केली आहे.

दरम्यान, या तारखेपर्यंत आधार-पॅन लिंक न केल्यास 1 जानेवारी 2026 पासून संबंधित पॅन कार्ड ‘इनऑपरेटिव्ह’ म्हणजेच अकार्यक्षम ठरणार आहे. यापूर्वी शासनाकडून अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र आता कोणतीही पुढील सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.

       

मार्च 2025 मध्ये काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, 1 ऑक्टोबर 2024 पूर्वी आधार एनरोलमेंट आयडीच्या आधारे पॅन कार्ड काढलेल्या नागरिकांसाठी आधार-पॅन लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अशा सर्व नागरिकांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

जर आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही, तर अनेक महत्त्वाची आर्थिक कामे थांबू शकतात. मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी, ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे सोने खरेदी करण्यासाठी, मालमत्ता व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक असते. पॅन अकार्यक्षम झाल्यास हे सर्व व्यवहार करता येणार नाहीत.

याशिवाय आयकर विवरणपत्र भरताना अडचणी येऊ शकतात. आयकर परतावा मिळणार नाही तसेच प्रलंबित टॅक्स रिफंड अडकून पडण्याची शक्यता आहे. आधार-पॅन लिंक नसल्यास टीडीएस आणि टीसीएस कपातीचा दर वाढू शकतो, ज्याचा थेट आर्थिक फटका नागरिकांना बसू शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!