महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांचीं खेळी; सुप्रिया सुळे, रोहित पवारांना दिली महत्वाची जबाबदारी

पुणे : नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकानंतर राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.मुंबईसह राज्यभरातील महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार कंबर कसली आहे. यासाठी राष्ट्रवादीने २९ महानगरपालिका निवडणूक प्रभारींची यादीच जाहीर केली आहे.
यात निवडणुकीची जबाबदारी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांवर सोपवली आहे. मुंबईची जबाबदारी रोहित पवार तर पुण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवली आहे.
राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रभारींची यादी

बृहन्मुंबई – आमदार रोहितदादा पवार

ठाणे – आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड
नवी मुंबई – आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश अध्यक्ष
उल्हासनगर – आमदार .डॉ. जितेंद्र आव्हाड
कल्याण डोंबिवली – खासदार बाळयामामा म्हात्रे
भिवंडी निजामपूर – . खासदार बाळयामामा म्हात्रे
मीरा भाईंदर – आमदार .डॉ. जितेंद्र आव्हाड
नाशिक – सुनिल भुसारा
मालेगाव – खासदार भास्कर भगरे
अहिल्यानगर – खासदार निलेश लंके
जळगाव – संतोष चौधरी
धुळे – प्राजक्त तनपुरे
पुणे – खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय कार्याध्यक्षा
पिंपरी चिंचवड – खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार
सोलापूर – खासदार धैर्यशील पाटील
कोल्हापूर – हर्षवर्धन पाटील
इचलकरंजी – बाळासाहेब पाटील
सांगली – मिरज – कुपवाड – आमदार जयंत पाटील
छत्रपती संभाजीनगर – खासदार बजरंग सोनवणे
नांदेड-वाघाळा – जयप्रकाश दांडेगावकर
परभणी – फौजिया खान
जालना – राजेश टोपे
लातूर – विनायक जाधव पाटील
अमरावती – रमेश बंग
अकोला – डॉ. राजेंद्र शिंगणे
नागपूर – अनिल देशमुख
चंद्रपूर – खासदार अमर काळे
