राहुल गांधी 100 टक्के पंतप्रधान होणार; पण अमित शाह…कोणी केलं भाकीत?, उडाली खळबळ…

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेता आणि सध्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे देशाचे १०० टक्के पंतप्रधान होणार असा दावा एका ज्योतिषाने केला आहे. त्यांच्या कुंडलीतच तो योग असल्याचा दावा या ज्योतिषाचा आहे.
‘राहुल गांधी पंतप्रधान होणारच’असं छातीठोकपणे ज्योतिषी मनीष अग्रवाल यांनी सांगितले आहे. त्यांनी १०० टक्केच नाही तर ११० टक्के हमी घेतली आहे. त्यांच्या मते राहुल गांधी यांच्या कुंडलीतच हा राजयोग आहे. ते भारताचे पंतप्रधान होतील हे त्यांच्या कुंडलीतच नमूद आहे. मनोज अग्रवाल यांचा दावा आहे की, राहुल गांधी १०० टक्केच नाही तर ११० टक्के देशाचे पंतप्रधान होतील.
या नवीन दाव्याने अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत. मनीष अग्रवाल यांच्या मते हा योग आताच, लागलीच नाही. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते, नेते यांना वाट पहावी लागणार आहे. त्याचे तारे हे जवळपास १० वर्षांनी चमकतील. त्यावेळी त्यांचे पंतप्रधान होण्याचे योग समोर येत आहेत.

म्हणजे २०३६ मध्ये ते पंतप्रधान होतील. त्याच वर्षी त्यांच्यासाठी हा राजयोग तयार होईल. येत्या लोकसभा निवडणुकीत त्याची पहिली चुणूक दिसून येईल असा दावा पण मनीष अग्रवाल यांनी केला आहे.

मनिष अग्रवाल यांनी या पॉडकॉस्टमध्ये अजून एक मोठा दावा केला आहे. त्यांच्यामते, अमित शाह यांची कुंडली अत्यंत प्रभावशाली आहे. त्यांच्या कुंडलीत पुढील दहा वर्षे केंद्रातील सत्तेचे योग आहेत. म्हणजे पुढील 10 वर्षांत त्यांचा सत्तेतील आणि राजकारणातील दबदबा कायम राहिल.
